या दुर्गा मंदिरात आहे भूत?


भारतात अनेक मंदिरे आणि त्याची काही ना काही वैशिष्टे आहेत. प्रत्येक मंदिराची एखादी तरी कथा आहे. मध्यप्रदेशातील देवास जवळ असलेले प्राचीन दुर्गा मंदिर याला अपवाद नाही. साधारणपणे देवाचे वास्तव्य असले तेथे भूते, आत्मे येत नाहीत असा समज असतो. हे दुर्गा मंदिर त्याला मात्र अपवाद आहे. असे सांगितले जाते कि या मंदिरात सूर्यास्तानंतर भाविक जात नाहीत कारण येथे त्यावेळी पांढरया साडीतील एका महिलेचा आत्मा भटकतो.

पौराणिक कथेनुसार देवासच्या महाराजांनी हे मंदिर बांधले. बांधल्यापासून येथे काही ना काही दुर्घटना घडल्या. राजाची मुलगी सेनापतीच्या प्रेमात पडली मात्र राजाला हे प्रेम मान्य नसल्याने राजकन्येला महालात बंदी केले गेले. सेनापतीच्या विरहाने ती मरण पावली ते ऐकून सेनापतीने दुर्गा मंदिरात जाऊन प्राणत्याग केला. पुरोहिताने राजाला मंदिर अपवित्र झाले आता नवी मूर्ती स्थापन करा असा सल्ला दिला त्यानुसार नवी मूर्ती आणली गेली, मात्र तरीही दुर्घटना थांबल्या नाहीत. या मंदिरात बळी दिला जातो असेही सांगतात.

या मंदिरात सूर्य मावळला की नंतर कुणीही फिरकत नाही. येथे एका महिलाच आत्मा भटकताना दिसतो असे सांगितले जाते. त्यामुळे सायंकाळनन्तर मंदिरात कोणतेच पूजाविधी केले जात नाहीत.

Leave a Comment