सात हजार वर्षांपासून लपून राहिलेले रहस्य झाले अचानक प्रकट !


ब्रिटनमध्ये एका तलावाच्या तळाशी असलेले सात हजार वर्षे जुने रहस्य अचानक प्रकट झाले आहे. अचानक हवामानामध्ये झालेल्या फरकाने हे रहस्य उघडकीला आल्याचे म्हटले जात आहे. हे रहस्य उघडकीला आल्याने तेथील रहिवाश्यांच्या आश्चर्याला पारावार उरलेला नाही. झाले असे, की ह्या तलावामधील पाणी आटल्यानंतर आणि त्याच्या तळाशी असलेली वाळू बाजूला सारल्यानंतर असे काही अवशेष सापडले आहेत, की ते पाहण्यसाठी बघ्यांची गर्दी होऊ लागली आहे.

ह्यासंबंधी प्रसिद्ध झालेल्या रिपोर्टमध्ये, क्वीन्सलँड मधील तलावामध्ये सापडलेले अवशेष सुमारे सात हजार वर्षे जुन्या आहेत. ह्या तलावाच्या ठिकाणी त्याकाळी एक मोठे अरण्य असावे असा वैज्ञानिकांचा कयास आहे. ह्या अरण्याला ‘बीस्ट ऑफ ईस्ट’ ह्या नावाने ओळखले जात असे. ह्या तलावातील पाणी आटल्यानन्तर आणि त्याच्या तळाशी असलेली रेती हटविली गेल्यानंतर हजारो वर्षे जुन्या असलेल्या झाडांचे अवशेष या तलावामध्ये मिळाले आहेत. सुमारे चारशे मीटर क्षेत्रामध्ये हे अवशेष विखुरलेले आहेत. हा तलाव आणि त्याच्या आसपास वसेलेले शहर हे प्राचीन काळी एका अरण्याचा भाग असून, त्याचा बहुतांश भाग पाण्याखाली गेला असल्याचे समजते.

ह्या तलावाच्या तळाशी जंगल असण्याची शक्यता १८७१ साली पहिल्यांदा व्यक्त करण्यात आली होती. त्याकाळी येथे अनेक हरणांचे आणि गव्यांचे हाडांचे सांगाडे आढळले होते. पण आता ह्या तलावाचे पाणी पुष्कळ अंशी कमी झाल्याने ह्या अरण्याचा विस्तार कितपत असावा, ह्याचा अंदाज बांधता येणे शक्य होऊ लागले आहे. तज्ञांच्या मते ही झाडे सात हजार वर्षांपूर्वीची असून, आदिमानवाच्या काळामध्ये हे अरण्य अस्तित्वात असण्याची शक्यता देखील तज्ञांनी वर्तविली आहे.

Leave a Comment