जगातला एकमेक पाच नद्यांचा संगम


उत्तर प्रदेशातील इटावा मुक्यालायापासून ७० किमीवर असलेल्या बिठोली येहते जगातील एकमेव असा पाच नद्यांचा संगम असून दरवर्षी कार्तिकी पौर्णिमेला येथे लाखो भाविक जमतात. यमुना, चंबळ, क्वारी, सिंधू आणि पहुज अश्या पाच नद्या येथे मिळतात मात्र हे स्थान चंबळच्या क्रूर डाकुंचे वसतीस्थान असल्याने या भागाचा आत्तापर्यंत विकास झालेला नाही. आता डाकूंचा उपद्रव कमी झाला असल्याने या भागाचा पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जावा अशी मागणी उत्तर प्रदेश सरकारकडे केली जात आहे.


जगात दोन नद्यांचा संगम अनेक ठिकाणी आहे. काही ठिकाणी तीन नद्या मिळतात त्याला त्रिवेणी संगम म्हटले जाते. भारतात प्रयाग म्हणजे अलाहाबाद येथे गंगा यमुना आणि सरस्वतीचा त्रिवेणी संगम असून हे स्थान धार्मिक दृष्टीने अतिशय पवित्र मानले गेले आहे. मात्र अशी लोकप्रियता या पंच नद्या संगमाला अजून मिळालेली नाही. या भागाला पर्यटन प्रोत्साहन मिळाले तर या भागाचा विकास होऊ शकण्र आहे

वास्तविक हा भाग महाभारकालीन संस्कृतीशी जोडलेला आहे. येथे पांडवानी अज्ञातवासात काही काळ वास्तव्य केले होते असे सांगतात. भीमाने बकासुराचा वध याच भागात केला होता. येथे जवळच असलेल्या महाकालेश्वर मंदिरात साधू संतांची गर्दी असते आणि भाविक येथे संगमात स्नान करण्यासाठी येतात.

Leave a Comment