एअर इंडियाचे ट्विटर अकौंट हॅक


भारत सरकारच्या एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीचे ट्विटर अकौंट बुधवारी रात्री उशिरा हॅक करण्यात आले असून या अकौंट वर करण्यात आलेल्या एकापेक्षा एक ट्वीट मुळे काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. एका ट्विट मध्ये सर्व फ्लाईट रद्द झाल्याची घोषणा केली गेली तर दुसर्यात तुर्की एअरलाईन वरून एअर इंडिया सेवा देणार असल्याचे ट्वीट केले गेले.

हे हॅकिंग तुर्की हॅकरकडून झाले असावे असा तर्क आहे. कारण हॅक झालेल्या अकौंटवर तुर्किश एअरलाईनचा फोटो आहे आणि सर्व ट्वीट तुर्की भाषेत आहेत. दरम्यान तुर्की सायबर आर्मी आयीलदिज टीम ने ट्विटर अकौंट हॅक केल्याचा दावा केला असून सर्व डेटावर कब्जा केल्याचे म्हटले आहे.

व्हेरीफाईड अकौंटवरून युजर बदल झाला तर काही वेळात अकौंटवरून ट्विटर व्हेरीफाइड मार्क जातो व पुन्हा युजरला आपली कागदपत्रे सादर करावी लागतात आणि खरा युजर अकौंट वापरतो आहे याची खात्री पटवून दिल्यानंतर पुन्हा अकौंट सुरु होते अशी पद्धत आहे. या बाबत एअर इंडिया कडून अजून कोणतीही कारवाई केली गेलेली नाही.

Leave a Comment