अमेरिकन बाजार पादाक्रांत करायला शाओमी सज्ज


भारत आणि दक्षिण पूर्व आशियात उत्तम पाय रोवल्यानंतर चीनी जायंट कंपनी शाओमी अमेरिकन बाजारात उतरण्यासाठी सज्ज झाली असून येत्या वर्ष अखेर ती अमेरिकन बाजारात पाउल टाकेल असे वॉल स्ट्रीट जर्नलच्या अहवालात म्हटले गेले आहे. कंपनीने पश्चिम युरोप मध्ये नुकताच व्यवसाय विस्तार केला आहे.

कंपनीचे अध्यक्ष ली जून यांनी कंपनीने नेहमीच व्यवसायासाठी अमेरिकन बाजार डोळ्यासमोर ठेवला होता असे सांगितले आहे. ते म्हणाले २०१८ च्या अखेरी अथवा २०१९ च्या सुरवातीला आमची उत्पादने अमेरिकी बाजारात दाखल होतील. भारतीय बाजारात शाओमी ने सॅमसंग ची बरोबरी केली आहे. भारतीय बाजारानेही अमेरिकेला मागे टाकत जगात दोन नंबरचा बाजार बनण्याची कामगिरी केली आहे. अर्थात अमेरिकन बाजारात शाओमी त्यांची काही उत्पादने वॉलमार्ट स्टोर मधून विकत आहे. त्यात अँड्राईड टीव्ही सेट टॉप बॉक्स, मी टीव्ही यांचा समावेश आहे.

Leave a Comment