ह्या देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण शून्य


आपल्या जगामध्ये आजच्या काळामध्ये गुन्हेगारी शून्य असलेला देश असू शकतो यावर खरे तर कोणाचाच विश्वास बसणार नाही. पण असा देश अस्तित्वात आहे. या देशामध्ये पोलीसव्यवस्था आहे, पण गुन्हेगारी अजिबात नाही. इतकेच काय, तर या देशाला परकीय शक्तींकडून देखील कोणताच धोका नसल्यामुळे या देशाकडे स्वतःचे सैन्यच नाही. हा देश आहे आईसलंड. ह्या देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण शून्य असून, हा देश सर्वाधिक सुरक्षित समजला जातो.

आईसलंड हा युरोप खंडातील एक लहानसा देश असून इथे पोलीस दिसतात, पण पोलिसांना कोणत्याही प्रकारचे हत्यार बाळगण्याची आवश्यकता नाही. आईसलंड हा जगातील सर्वात सुंदर आणि प्रेक्षणीय देशांपैकी एक समाजला जातो. पश्चिमी युरोप मध्ये वसलेल्या या देशामध्ये भ्रमंती करण्यासाठी जगभरातून हौशी पर्यटक येथे येत असतात. ह्या देशामध्ये अनेक सुंदर समुद्र किनारे आहेत. तसेच अनेक न्यूड बीचेस देखील आहेत.

सर्वात आश्चर्याची गोष्ट अशी की या देशामध्ये एकही जंगल किंवा अरण्य अस्तित्वात नाही. तरी ही या देशामध्ये जेव्हा मानवी वस्ती निर्मित होत होती तेव्हा काही कोल्हे येथे आढळून आले होते. या देशामध्ये सर्वात विशेष गोष्ट अशी, की इथे राहणाऱ्या नागरिकांची नावे आहेत, पण त्यांना उपनाम , किंवा आडनाव नाही. त्यामुळे नावावरून इथे कोणत्याही प्रकारचे वर्णभेद किंवा जातीभेद नाहीत. या देशामध्ये एकही रेल्वे स्टेशन नाही, त्यामुळे जो काही प्रवास करायचा तो गाड्यांमधूनच करावा लागतो.

या देशामध्ये थंडी, बर्फवृष्टीचे प्रमाण भरपूर आहे. सुरुवातीला इथे जेव्हा मानवी वस्ती सुरु झाली, त्याकाळी लोकांकडे पैसा नव्हता, शिक्षण देखील नव्हते. पण तरीही त्याकाळी देखील ह्या देशामध्ये गुन्हेगारी अस्तित्वात नव्हती. आज हा देश प्रगत आहे, येथे राहणारे नागरिक संपन्न आहेत, पण सुदैवाने गुन्हेगारी अजूनही येथे प्रवेश करू शकलेली नाही.

Leave a Comment