गुगलने मॅप सुविधेत केले काही महत्त्वापूर्ण बदल


आपल्याला पोहोचायचे असलेले ठिकाण गुगल मॅप्सवर टाकले की तो आपल्याला योग्य पद्धतीने त्याठिकाणी नेऊन पोहचवतो. त्याचबरोबर अनेक शॉर्टकट, तसेच कुठे वळावे लागेल, किती वेळाने वळावे लागेल याची इत्यंभूत माहिती गुगल मॅपच्या माध्यमातून मिळत असते. पण एवढी सुविधा असूनही आपली अनेकदा गल्लीबोळातील रस्ते शोधताना तारांबळ उडते. पण गुगलने याचाच विचार करुन भारतीयांसाठी गुगल मॅप या आपल्या सुविधेत काही महत्त्वाचे बदल केले आहेत.

प्लस कोडस नावाचे एक नवीन फिचर यासाठी लाँच करण्यात आले आहे. हे फिचर खास भारतीयांसाठी तयार करण्यात आले असून भारतीयांचे रस्ते शोधण्याचे काम या फिचरमुळे आणखी सोपे होणार आहे. प्रत्येक लोकेशनसाठी यामध्ये एक युनिक कोड देण्यात येणार आहे, ज्यामुळे विशिष्ट ठिकाण शोधणे सोपे होणार आहे. त्यामुळे तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचे असेल आणि तुम्ही गुगल मॅपच्या साह्याने रस्ता शोधत असाल तर तुम्हाला मॅप्सवर काही गोष्टींची नोंद करावी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला नेमका पत्ता सहज सापडू शकेल. यासाठी गुगल मॅपवर त्या कोडबरोबरच त्या शहराचे नाव टाकावे लागेल. त्यानंतर आपल्याला हवी असलेली जागा मिळेल.

Leave a Comment