गुगलने डूडलद्वारे सांगितले ‘पाय डे’चे महत्व


नवी दिल्ली – १४ मार्च हा दिवस ‘पाय डे’ (π) म्हणून साजरा केला जातो. गुगलने या निमित्त डूडलद्वारे या दिवसाचे महत्त्व सांगितले आहे. ‘पाय’ महत्त्वाच्या गणितीय निर्धारकांपैकी एक भौतिक निर्धारक असून हा दिवस जगभरातील गणित तज्ञ दर वर्षी साजरा करतात. ‘पाय’चा १७०६ मध्ये सर्वप्रथम वापर विलियम जोंस यांनी केला. स्विस गणित तज्ञ लियोगार्ड यूलर यांनी १७३७ मध्ये त्यांच्या एका प्रयोगासाठी ‘पाय’चा वापर केला ‘पाय’ची विशेष ओळख तेव्हापासून निर्माण झाली.

सर्वप्रथम विज्ञान तज्ञ लैरी शॉ यांनी१९८८ मध्ये ‘पाय डे’ (π) साजरा केला. पेस्ट्री, बटर, सफरचंद आणि संत्र्याची सालटं यांचा गुगलने डूडलमध्ये उपयोग केला आहे. गुगलच्या दुसऱ्या G साठी ‘पाय’ चिन्हाचा वापर केला गेला आहे. तर अवॉर्ड विनिंग पेस्ट्री शेफ यांनी हे डूडल बनविले आहे. १४-०३-१८ ही आजची तारीख आपण अशी लिहीत असलो तरी अमेरिकेत ती ०३-१४-१८ अशी लिहीतात. या तारखेतले पहिले तीन आकडे ‘पाय’च्या ३.१४ या पहिल्या तीन आकड्यांशी जुळतात. त्यामुळे हा दिवस ‘पाय डे’ म्हणून साजरा केला जातो.

Leave a Comment