देखण्या इमारतींचे सुंदर शहर रॉटर्डम


आरामदायी आयुष्य जगण्यासाठी सर्व सुविधा पुरविणाऱ्या शहरात आपलेही वास्तव्य असावे अशी बहुतेकांची इच्छा असते. जगभरातील लोक त्यासाठी दुबई सारख्या शहरात कामधंदा शोधण्याची आस बाळगून असतात. मात्र दुबईच्या तोडीचे आणखी एक शहर युरोपातील हॉलंड येथे असून त्याचे नाव आहे रॉटर्डम, हॉलंडचा अॅमस्टरडॅम चे जुळे शहर अशीही त्याची ओळख आहे.


हे शहर दुसरया महायुद्ध काळात प्रसिद्ध बंदर होते पण तेव्हा जर्मन विमानांनी या बंदरावर प्रचंड बॉम्बफेक करून ते पूर्ण उध्वस्त केले होते. पाच दिवस हे शहर जळत होते. त्यानंतर त्याची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला गेला. नवी बांधकामे करताना अनेक सुंदर आणि अनोख्या प्रकारच्या इमारती येथे उभारल्या गेलाय. उंच उंच इमारतींनी नटलेल्या या शहरातील दिवस गुलजार तर रात्री रंगीन असतात. ऐषारामी आयुष्य जगण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा येथे आहेत.


येथील रेल्वे स्थानकही पाहण्यासारखे आहे.काच, लाकूड आणि स्टीलचा वापर करून ते देखणे बनविले गेले आहे. घोड्याच्या नळाच्या आकाराच्या प्रचंड इमारतीत मॉल आहेत तशीच राहती घरेही आहेत. ट्रान्स अमेरिकन ही पिरामिड च्या आकाराची ४८ मजली इमारत अशीच नजर खिळवून ठेवते. शहरात ट्राम मधून फिरण्याची सोय आहे. नुसत्या वेगवेगळ्या आकाराच्या खिडक्या पहायच्या म्हटले तरी काही दिवस लागतील अशी या शहराची ख्याती आहे.

Leave a Comment