यंदा पाऊसमान घटणार, काही पिकांना फटका शक्य


मान्सून यंदा कमी प्रमाणात बरसेल असा अंदाज अमेरिकेतील खासगी संस्था रेडीअंट सोल्युशनने वर्तविला आहे. अल निनो कार्यान्वित झाला असून त्याचा परिणाम जून नंतर दिसेल असे या संस्थेचे वरिष्ठ हवामान तज्ञ काईल टॅपले याचे म्हणणे आहे.

या अंदाजानुसार भारतात कमी पावसाचे फटका सोयाबीन, कापूस, शेंगदाणा या पिकांना बसण्याची शक्यता आहे. ला नीना कमजोर झाला असून अल निनोचा प्रभाव वाढू लागला आहे. अल निनोच्या प्रभावामुळे आशिया खंडाच्या काही भागात दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते तर द.अमेरिकेत जादा पाउस होतो. अल निनोमुळे ऑस्ट्रेलियाच्या पूर्व भागात दुष्काळ पडेल व त्याचा फटका गहू पिकाला बसेल, आर्जेन्टिना मध्ये पाउस लवकर सुरु होईल असाही अंदाज वर्तविला गेला आहे.

अल निनो या स्पॅनिश शब्दाचा अर्थ लहान मुलगा असा आहे. उष्ण कातीबंधात प्रशांत महासागरात पेरू आणि एक्वडोर किनारी भागात समुद्र पाण्याचे तापमान वाढल्यामुळे निर्माण होणारी ही स्थिती असून याचा परिणाम जगभरातील पाऊसमानावर होतो.

Leave a Comment