भारतातील स्मार्टफोन उत्पादक मायक्रोमॅक्स कंपनी आता स्मार्टफोन बरोबरच अन्य इलेक्ट्रोनिक उपकरणांचे उत्पादन करणार असून त्यासाठी येत्या वर्षात २०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. कंपनी टीव्ही, धुलाई मशीन, रेफ्रीजरेटर, एसी बनविणार आहे असे कंपनीचे सहसंस्थापक राजेश अग्रवाल यांनी सांगितले.
मायक्रोमॅक्स टीव्ही, धुलाई मशीन उत्पादन करणार
अग्रवाल म्हणाले, कंपनी वाशिंग मशीनची १६, एसीची १०, एअरकुलरची ८ मॉडेल लाँच करणार आहे. २०२० पर्यंत कंपनीने २००० कोटी कमाईचे लक्ष्य ठेवले असून गेल्या दोन वर्षात कंपनीने या क्षेत्रात ३०० कोटींची गुंतवणूक केली आहे, या वर्षात आणखी २०० कोटी गुंतविले जात आहेत.