पतंजलीचे दिव्यजल पळविणार कंपन्याच्या तोंडचे पाणी


सर्वसामान्य लोकांच्या गरजेची बहुतेक सर्व उत्पादने बाजारात आणून योगगुरु रामदेवबाबा याच्या पतंजली आयुर्वेद ने भल्या भल्या मल्टीनॅशनल कंपन्यांच्या नाकात दम आणला असताना आता बाटलीबंद पाणी व्यवसायातील कंपन्यांपुढे आव्हान उभे केले आहे. पतंजली येत्या उन्हाळ्यात बाटलीबंद पाणी व्यवसायात उतरत असून दिव्यजल नावाने त्याचे पाणी भारतीय बाजारात येत आहे. त्यासाठी देशभर वितरक निवडण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याचे कंपनीचे प्रवक्ते एस. तीजारीवाला यांनी सांगितले.

भारतात बाटलीबंद पाणी व्यवसाय दरवर्षी २० ते २५ टक्के वाढत असला तरी या क्षेत्रावर मोजक्या कंपन्याचे वर्चस्व आहे. जगभरात पिण्याचे पाणी आणि त्याच्याशी संबंधित उद्योग यावर रिसर्च करणारी कंपनी युरोमॉनिटर याच्या अहवालानुसार २०१८ मध्ये भारतात १८ हजार कोटींवर जाणार आहे. या क्षेत्रावर बिसलेरीचे वर्चस्व असून त्याचा बाजारातील वाटा ४० टक्के आहे. किनले आणि अॅक्वाफिना याचा वाटा २५ टक्के तर अन्य ३५ टक्क्यात बाकी कंपन्या आहेत. त्यात टाटाचे पॉवरप्लस, हिमालय, किंगफिशर याचा समावेश आहे.

दिव्यजल चे उत्पादन लखनौ आणि हरिद्वार येथील प्रकल्पात होणार असून हे पाणी आश्चर्यजनक किमतीत लोकांना उपलब्ध केले जाणार असल्याचे समजते.

Leave a Comment