यावषी सर्वात मोठे ‘डील’ करणार विराट कोहली


मुंबई – नागपूरचे प्रसिद्ध क्रिकेट ज्योतिषी नरेंद्र बुंदे यांनी भारतीय संघाचा कर्णधार व विक्रमवीर विराट कोहली अनेक नवे विक्रम नोंदवणार असून या वर्षात भारतीय क्रीडा क्षेत्रतील तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वात मोठा रकमेचा विक्रमी करार करणार असल्याचे भाकीत केले आहे. तो २०२५ पर्यंत सचिन तेंडुलकरचा शंभर शतकांचा विक्रमही मागे टाकेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

नरेंद्र बुंदे हे नागपूरचे रहिवासी असून क्रिकेट ज्योतिषाचार्य आहेत. त्यांनी गेल्या वषी धोनी २०१९ मधील इंग्लंडमध्ये होणा-या विश्वचषक खेळणार असल्याचे भाकीत केले होते. तेही अशा वेळी जेव्हा धोनीच्या संघातील स्थानाबाबतच शंका व्यक्त करीत होते. आता त्यांनी कोहलीचे भविष्य सांगितले असून तो टी-२० विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक जिंकणार असल्याचे म्हटले आहे. याशिवाय तो २०२५ पर्यंत तेंडुलकरचा शंभर शतकांच्या विक्रमाला गवसणी घालेल, असेही त्यांनी म्हटले आहे.

माझी यापूर्वीची सर्व भाकिते खरी ठरली आहेत. विराट २०२५ पर्यंतच्या कालावधीत एकदिवसीय व टी-२० विश्वचषक जिंकणार असल्याचे तसेच सचिनचा शतकांचा विक्रमही मागे टाकणार असल्याचे मला दिसत आहे. याशिवाय २०१८ मध्ये भारतीय क्रीडा क्षेत्राच्या इतिहासातील आजवरचा सर्वात मोठा करार करणार असल्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले आहे.