कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी ९ कोटी ४५ लाखांची भरपाई देणार सरकार


मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेतील चर्चेला उत्तर देताना कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सरकार 9 कोटी 45 लाखांची नुकसान भरपाई देणार असल्याची माहिती दिली. सरकार भीमा कोरेगाव घटनाप्रकरणी व्यक्ती, जाती,धर्म निरपेक्ष भूमिकेतूनच कारवाई करत असून आपला राजधर्म सरकार पाळत आहे.

एकूण ५८ गुन्हे, १६२ अटकेत, जखमी पोलिस आधिकारी जखमी पोलिस, एक मृत्यूमुखी या प्रकरणात पडले. तसेच ९ कोटी ४५ लाखांची नुकसान झाली. राज्य सरकारने त्याची भरपाई देण्याचा निर्णय घेतला. ३ तारखेच्या बंदमध्ये तीन कोटींचे नुकसान झाले तर अॅट्रॉसीटीच्या ११९९ आरोपींना अटक आणि २०५४ प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. सध्याच्या घडीला फक्त २२ लोक आता अटकेत असून बाकीच्यांची मुक्तता झाली आहे. ३०० ते ३५० लोकांवर गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली. परंतु त्यांचीही बेल झाली. बंद प्रकरणातील गुन्हे मागे घेणार असून अतिरिक्त महासंचालकांची समिती गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी नेमण्यात येईल. तीन महिन्यात ही समिती अहवाल देईल. पण, गुन्हेगारी पार्श्वभूमीवाल्या काही लोकांनी बहती गंगा मे हाथ धुवून लुटपाट केली. अशा लोकांचे गुन्हे मागे घेतले जाणार नाहीत.