जिओसोबत काम करण्याची सुवर्णसंधी


नवी दिल्ली : नोकरीच्या अनेक संधी रिलायन्स इंडस्‍ट्रीजच्या जिओमध्ये उपलब्ध असून अलिकडेच एक आवेदन जाहिर करून रिलायन्स जिओने पदांसाठी अर्ज करण्याचे आवाहन केले आहे. १.२० लाख लोकांना रोजगार देण्याचे लक्ष्य लॉन्चिंगच्या वेळेस रिलायन्स जिओने ठेवले होते. आपल्या वेबसाईटवरुन कोणत्या कॅटेगरीत नोकरीची संधी आहे, हे जिओने जाहिर केले आहे. आता रिलायन्स जिओसोबत काम करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.

तुम्ही जिओ.कॉम आणि करिअर.जिओ.कॉम वर जॉबसाठी अप्लाय करु शकतात. तुम्हाला यासाठी सर्वात आधी रजिस्टर करावे लागेल. तुम्हाला रजिस्टर करताना मोबाईल नंबर द्यावा लागेल. पूर्ण फॉर्म भरल्यानंतर मोबाईलवर एसएमएसच्या माध्यमातून कन्फर्मेशन मिळेल. त्यानंतर पुन्हा तुम्हाला करिअर.जिओ.कॉम वर लॉग इन करावे लागेल.