सनीने माझा नंबर पोर्न इंडस्ट्रीत दिला – राखी सावंत


आयटम गर्ल राखी सावंतच्या नावासोबतच वाद हा जोडलाच जातो. राखी सध्या सनी लिओनीवर केलेल्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. सनीवर एक गंभीर आरोप राखीने केला असून राखीने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सनीने तिचा मोबाइल नंबर पॉर्न इंडस्ट्रीमध्ये दिल्याचा आरोप केला आहे. राखी म्हणाली की, सनीने पॉर्न इंडस्ट्रीमध्ये माझा मोबाइल नंबर दिल्यानंतर मला अनेक फोन तिथून येऊ लागले. माझ्या व्हिडिओबद्दल आणि मेडिकल सर्टिफिकेटबद्दल ते विचारत आहे. ते मला चांगली रक्कम देण्यासही तयार आहेत. पण या कामात मला काहीही स्वारस्य नाही.

राखी पुढे म्हणाली की, सनीला तिला जुळी मुले झाली त्याबद्दल शुभेच्छा देणारा एक व्हिडिओ मी शेअर केला होता. सनीने शुभेच्छांचा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला एका वेगळ्या नंबरवरुन फोन केला आणि मी तिचा मत्सर करते का असा प्रश्न सनीने मला विचारला. सनीचा मी मत्सर का करेन? मी बॉलिवूडमध्ये चांगले काम केले आहे. माझा चित्रपट प्रेक्षक सह-कुटूंब पाहू शकतात. माझे तिला फक्त एवढेच सांगणे आहे की त्या क्षेत्राशी निगडीत लोकांनी माझ्या मोबाइल नंबरचा गैरवापर करु नये.