Skip links

अग्रवाल यांच्या जाण्याने कोणतेही नुकसान नाही : मुलायम सिंह


नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव यांनी राज्यसभेचे तिकीट न मिळाल्याने समाजवादी पक्ष सोडून भाजपमध्ये गेलेल्या नरेश अग्रवाल यांच्यावर आता निशाणा साधला आहे. नरेश अग्रवाल यांच्या जाण्याने कोणतेही नुकसान होणार नाही, झाला तर पक्षाला फायदाच होईल असे यादव यांनी म्हटले आहे.

काल (सोमवार) नरेश अग्रवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी त्याचवेळी बोलताना जया बच्चन यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. मुलायम सिंह यादव आणि रामगोपाल यांची साथ कधीच सोडणार नाही. मी त्यांच्यासोबत आहे. माझे तिकीट चित्रपटात डान्स करणारीसाठी कापण्यात आले. माझा मुलगा आमदार आहे आणि तो राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान करेन. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपध्यक्ष अमित शाह यांचे आभार, असे वक्तव्य नरेश अग्रवाल यांनी केले होते.

त्यांच्यावर या वादग्रस्त वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून टीका करण्यात आली. अग्रवाल यांनी त्यानंतर आपल्या वक्तव्याबाबत खेद व्यक्त केला. माझ्या वक्तव्यामुळे जर कोणी दुखावले गेले असेल तर मी त्याविषयी खेद व्यक्त करतो, असे अग्रवाल यावेळी म्हणाले.

Web Title: Party No losses on Agarwal's exit: Mulayam Singh