Skip links

चित्रपटात नाचणारीसाठी कापले माझे तिकीट : नरेश अग्रवाल


नवी दिल्ली : भाजपमध्ये प्रवेश करताच वादग्रस्त वक्तव्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या नरेश अग्रवाल यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले असून समाजवादी पार्टीने यावेळी उत्तर प्रदेशमधून पुन्हा एकदा जया बच्चन यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला त्यावर नरेश अग्रवाल यांनी राज्यसभेचे माझे तिकीट हे चित्रपटात एका नाचणारीसाठी कापण्यात आल्याचे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, नरेश अग्रवाल यांच्या वक्तव्याच्या गांभीर्यतेचा अंदाज यावेळी व्यासपीठावर असलेल्या भाजप नेत्यांना आला. अग्रवाल यांच्या वक्तव्यावर व्यासपीठावरील भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. चित्रपटात असो किंवा वास्तविक जीवनात, भाजप पक्ष सर्व सदस्यांचा सन्मानच करतो, असे पात्रा म्हणाले. राज्यसभेवर न पाठवल्यामुळे नाराज झालेल्या नरेश अग्रवाल यांनी समाजवादी पार्टीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला. जोपर्यंत राष्ट्रीय पक्षात जाणार नाही, तोपर्यंत राष्ट्रीय समस्या सुटणार नाहीत, असे ते म्हणाले.

Web Title: Naresh Agrawal regrets but blames media for distorting his 'dance karnewali' remark on Jaya