Skip links

खगोल शास्त्रज्ञांनी लावला नवीन १५ ग्रहांचा शोध


टोक्यो : अंतराळात संशोधन करणाऱ्या खगोल शास्त्रज्ञांना आपल्या संशोधनात नवे १५ ग्रह शोधून काढले असून सुपर अर्थ अशी नावे यामधील तीन ग्रहांना दिली आहेत. तसेच यातील एका ग्रहावर संशोधनात खगोल शास्त्रज्ञांना पाणी सापडले असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या अगोदर झालेल्या संशोधनात देखील पाणी सापडले आहे. तसेच मंगळ ग्रहावर देखील पाणी सापडले आहे.

जपानच्या टोक्यो इंस्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या खगोल शास्त्रज्ञांनी हा शोध लावला आहे. त्यांनी यामध्ये जगातील सर्वात सुंदर आणि महत्वाच्या टेलीस्कोपची मदत घेतली आहे. यामध्ये अमेरिकेतील नासाच्या के२ ची आणि स्पेनच्या नॉरडिक ऑप्टिकल टेलीस्कोपची मदत घेतली आहे.

संशोधकांच्या माहितीनुसार, शोध लावलेले नवीन १५ ग्रह हे सौरमंडळात असून लाल रंगाच्या ताऱ्यांभोवती हे सर्व ग्रह फिरत आहेत. लाल तारे हे आकारात सामान्य असून ते अधिक थंड असल्यामुळे संशोधकांच्या मते भविष्यात एक्सोप्लॅनेट संदर्भात आकर्षक माहिती मिळू शकते. हे ग्रह पृथ्वीपासून २०० प्रकाश वर्ष दूर स्थित आहेत. हे तिनही ग्रह पृथ्वीपेक्षा मोठे आहेत.

Web Title: Japan Astronomers invented new 15 planets