Skip links

आयपीएलच्या नवीन अँथम साँगला नेटीझन्सचाही चांगला प्रतिसाद


अवघ्या काही दिवसांवर आयपीएलचा अकरावा हंगाम येऊन ठेपलेला असताना, या नवीन हंगामासाठी अँथम साँग काल प्रसारित करण्यात आले. स्टार स्पोर्ट्स या वाहिनीकडे यंदा आयपीएल सामन्यांच्या प्रसारणाचे हक्क असल्यामुळे यंदाच्या अँथममध्येही क्रीडा प्रसारणात अग्रगण्य मानल्या जाणाऱ्या या वाहिनीने आपला वेगळेपणा जोपासला आहे. यंदाच्या हंगामाचे अँथम साँग ये देश हे वीर जवानोंका या सुप्रसिद्ध हिंदी गाण्याच्या पार्श्वभूमीवर रचण्यात आलेले आहे.


हे गाणे हिंदी, तामिळ, बंगाली, कन्नड आणि तेलगू या पाच भाषांमध्ये प्रसिद्ध केले जाणार आहे. या थीम साँगवर दक्षिण आफ्रिकेचा चित्रपट दिग्दर्शक डॅन मेस, संगीत दिग्दर्शक राजीव भल्ला, वोकलिस्ट सिद्धार्थ बसरुर यांनी काम केले आहे. या आयपीएल अँथम साँगच्या माध्यमातून भारतातील कोट्यवधी क्रीडा रसिक पुन्हा एकदा आपल्या आवडत्या स्पर्धेचा आनंद घेऊ शकतील असे वक्तव्य, बीसीसीआयचे विशेष कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांनी केले आहे.

Web Title: IPL 2018 Official Anthem Theme Song Launched by Star Sports