ह्युंदाईचे आय १० ड्युल टोन एडिशन भारतात लॉन्च


नवी दिल्‍ली : भारतात सर्वात जास्त विकली जाणा-या ह्युंदाईच्या ग्रॅन्ड आय १० कारचा आणखी जबरदस्त अवतार लॉन्च करण्यात आला असून ग्रॅन्ड आय१० ड्युअल टोन एडिशन कंपनीने भारतात लॉन्च केले आहे. ग्रॅन्ड आय१० च्या स्फोर्ट्स व्हेरिएंटवर ड्युअल टोन एडिशनला तयार करण्यात आले आहे.

५.९९ लाख रूपयांपासून सध्याच्या ग्रॅन्ड आय१० स्फोर्ट्स पेट्रोल कारची किंमत सुरू होते. तर ६.२४ लाख रूपयांपासून ड्युअल टोनची किंमत सुरु होते. त्यासोबतच डीझल व्हर्जनबाबत सांगायचे तर याची किंमत ७.०२ लाख रूपये आहे. तर ड्युअल टोन कारसाठी तुम्हाला ७.२३ लाख रूपये खर्च करावे लागतील. कोणताही बदल याच्या इंजिन स्पेसिफिकेशनमध्ये करण्यात आलेला नाही.

ही कार ड्युल टोनसोबत सादर करण्यात आली असून ऑल ब्लॅक डॅशबोर्डसोबत फॅब्रिक अपहोल्स्ट्री यात देण्यात आली आहे. रेड कॉन्स्ट्रास स्टिचिंग यावर केली गेली आहे. यासोबतच गिअर शिफ्ट नोब आणि लेदर असलेले स्टीअरींग व्हीलवर रेड हायलायटर सुद्धा याला अधिक आकर्षक बनवतात. तसेच, यात एबीएस, अलॉय व्हील आणि लेदर असलेला स्टीअरींग व्हील देण्यात आले आहे.