Skip links

बारावीच्या विद्यार्थ्यांना मिळणार रसायनशास्त्राच्या ‘त्या’ चुकांचे ७ गुण ?


मुंबई : बारावीच्या रसायनशास्त्राच्या प्रश्नपत्रिकेत चार चुका असल्याचे समोर असल्यामुळे विद्यार्थ्यांना सात गुण बोनस मिळण्याची शक्यता आहे. २८ फेब्रुवारीला बारावीच्या रसायनशास्त्राची परीक्षा होती. त्यामध्ये चार प्रश्नांत छपाईच्या चुका होत्या. विद्यार्थ्यांना या चुकांमुळे सात गुण द्यावे लागणार असल्याची ही शिफारस मुख्य नियंत्रकांनी घेतलेल्या बैठकीत करण्यात आली.

केवळ प्रश्न क्रमांक लिहिला आणि उत्तराची जागा ज्या विद्यार्थ्यांनी मोकळी सोडली, त्यांनाही बोनस गुणांचा लाभ होणार आहे. पण अद्याप कोणतीही शिफारस मिळाली नसल्याचे राज्य बोर्डाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले. तज्ज्ञांकडून बारावीची प्रश्नपत्रिका तयार केली जाते, मग या प्रश्नपत्रिकेत एवढ्या चुका कशा, हा प्रश्न उपस्थित होत आहे. दोषींवर या चुकांसाठी कारवाई करावी, अशी मागणी शिक्षण क्षेत्रातील जाणकारांकडून केली जात आहे. बारावीच्या परीक्षेतील चुकांमुळे पुन्हा एकदा बोर्डाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Web Title: HSC students get 7 marks for chemistry?