फेरारीने भारतीय बाजारपेठेत उतरवली आपली नवी आणि लक्झरी कार


नवी दिल्ली : आपली नवी आणि लक्झरी कार जगातील सर्वाधिक वेगवान कार बनवणाऱ्या फेरारीने भारतीय बाजारपेठेत दाखल केली आहे. फेरारी ८१२ सुपरफास्ट असे या नव्या कारचे नाव असून ब्रँड न्यू फेरारी व्ही १२ जीटीने सर्वाधिक पावरफूल एफ १२ या कारला रिप्लेस केले आहे. या गाडीचा स्पीड एवढा आहे की, ही गाडी डोळे मिटताच अवघ्या सेकंदात तुमच्या डोळ्यासमोरुन गायब होईल.

फेरारी ८१२ सुपरफास्ट व्ही १२ इंजिन २.९ सेकंदांत १०० किमी प्रति तासाचा स्पीड घेते. त्याचबरोबर हे व्ही १२ इंजिन २०० किमी प्रति तास एवढा स्पीड ७.९ सेकंदात पकडतो. व्ही १२चा टॉप स्पीड ३४० किमी प्रति तास आहे. ही गाडी जर आपल्या पूर्ण स्पीडमध्ये चालली तर दिल्ली ते मुंबई हे अंतर अवघ्या सव्वा चार तासात गाठू शकते.

कंपनीच्या जुन्या कार प्रमाणेच फेरारी ८१२ सुपरफास्टचे डिझाईन आहे. पण याच्या हेडलॅम्प्समध्ये काही बदल करण्यात आले आहेत. फेरारी ८१२ सुपरफास्टमध्ये एफ१२ च्या तुलनेत अनेक नवे फिचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने फेरारी ८१२ सुपरफास्टमध्ये इलेक्ट्रॉनिक साईड स्पिल कंट्रोल दिले आहे जे ड्रायव्हिंगसाठी खूपच फायदेशीर आहे. ५.२ कोटी रुपये एवढी भारतीय बाजारात लॉन्च करण्यात आलेल्या या कारची किंमत आहे. भारतात फेरारी ८१२ सुपरफास्ट ही कार रेड, ब्लू आणि सिल्वर रंगांत उपलब्ध होणार आहे.

Leave a Comment