Skip links

टी-२० त राहुलच्या नावावर नकोशा ‘विक्रमा’ची नोंद


कोलंबो – ट्वेन्टी- २० क्रिकेट सामन्यांमध्ये हिट विकेट होणारा लोकेश राहुल हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. लोकेश राहुलचा पाय जीवन मेंडिसच्या गोलंदाजीवर यष्टीला लागला आणि राहुलच्या नावावर या नकोशा ‘विक्रमा’ची नोंद झाली.

सोमवारी भारताचा सामना निदाहास चषक तिरंगी ट्वेन्टी- २० क्रिकेट स्पर्धेत श्रीलंकेशी झाला. रिषभ पंतच्या जागी संघात स्थान मिळालेला लोकेश राहुल जबाबदारीने खेळत होता. पण राहुलचा १८ धावांवर खेळत असताना मेंडिसच्या गोलंदाजीवर पाय यष्टीला लागला. लोकेशला हिट विकेट झाल्याने माघारी परतला. लोकेश राहुलच्या नावावर टी- २० त हिट विकेट होणारा पहिला भारतीय अशा नकोशा विक्रमाची नोंद झाली आहे.

तो ट्वेंटी- २० क्रिकेटमध्ये हिट विकेट होणारा नववा फलंदाज ठरला आहे. या यादीत ए बी डिव्हिलियर्स, श्रीलंकेचा दिनेश चंडिमल आणि पाकिस्तानच्या मिसबाह उल हक, मोहम्मद हाफीज यांचा समावेश आहे.

Web Title: Dubious Distinction For KL Rahul As He's The First Indian To Be Dismissed Hit Wicket In The T20I Format