‘संघा’वरील चित्रपटासाठी भाजपचे १०० कोटींचे फंडींग


आतापर्यंत बाहुबलीसह अनेक ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कथा लिहिणारे लेखक विजयेंद्र प्रसाद हे लवकरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा इतिहास दाखवणारी कथा लिहिणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भाजप स्वतः या प्रोजेक्टमध्ये पैसे गुंतवणार आहे. संघाची स्थापना ते आतापर्यंतचा त्यांचा प्रवास चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च उचलण्याची तयारी भाजपने दाखवली असून हा प्रोजेक्ट सुमारे १०० कोटी रुपयांचा असणार आहे. संघाच्या समोर आलेली संकटे आणि त्यांच्या यशापयशावर या चित्रपटात प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटासाठी बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्सचा विचार केला जात आहे.