Skip links

‘कटप्पा’ची होणार लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयात एंट्री


भारतीय चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या आणि ‘बाहुबली’ या चित्रपटातील ‘कटप्पा’च्या भूमिकेने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या सत्यराज यांचा पुतळा लंडनच्या मादाम तुसाँ संग्रहालयात उभारण्यात येणार आहे. ही माहिती सत्यराज यांचा मुलगा सिबिराजने ट्विटरच्या माध्यमातून चाहत्यांना दिली आहे. तमिळ सिनेसृष्टीतील सत्यराज हे पहिले तमिळ अभिनेते ठरणार आहेत, ज्यांचा पुतळा मादाम तुसाँमध्ये उभारण्यात येणार आहे.

सोशल मीडियावर चाहत्यांकडून सध्या शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. तमिळ चित्रपटसृष्टीतील सत्यराज यांचे योगदान मोलाचे आहे. ते या जवळपास तीन दशकांपासून इंडस्ट्रीत आहेत, पण ते ‘कटप्पा’च्या भूमिकेने घराघरांत पोहोचले. त्यांनी एस.एस. राजामौली दिग्दर्शित या ‘बाहुबली: द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लुजन’ या दोन्ही चित्रपटांत साकारलेल्या भूमिकेने प्रेक्षकांची दाद मिळवली.

Web Title: Baahubali's Kattappa to get a statue at London Wax Museum