Skip links

स्टेट बँकेने घेतलेल्या ‘या’ निर्णयाचा २५ कोटी खातेदारांना होणार फायदा


नवी दिल्ली : तुमचे खाते जर स्टेट बँक ऑफ इंडियात असेल आणि त्यातील रक्कम ‘मिनिमम बॅलन्स’च्या खाली गेली तर आता तुम्हाला ५० रुपयांऐवजी फक्त १५ रुपयेच दंड भरावा लागणार असून एक एप्रिल २०१८ पासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू होईल. देशभरातील तब्बल २५ कोटी खातेदारांना त्यामुळे याचा फायदा होणार आहे.

बँक रिटेल आणि डिजिटल बॅंकिंगचे एमडी पीके गुप्ता आमच्या ग्राहकांच्या भावना आणि त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यानंतरच हा निर्णय घेतल्याचे म्हणाले. मेट्रो आणि शहरी परीसरातील खातेदारांना मिनिमम बॅलन्स न ठेवल्यास ५० रूपयांवरून १५ रूपये दंड केला आहे. लहान शहरांमध्ये चार्ज ४० रुपयांहून १२ रूपये करण्यात आला आहे. तर ग्रामीण भागांमध्ये मिनिमम बॅलन्स न ठेवण्यावरचा चार्ज ४० रूपये नाही तर १० रूपये लागणार आहे. या चार्जवर जीएसटी वेगळा लागेल.

Web Title: 25 crore account holders of 'this' will benefit decision taken by SBI