चीन करतेय ६ जी नेटवर्कची तयारी


जगभरात अजून अनेक ठिकाणी फोरजी नेटवर्क पूर्णपणे वापरात आलेले नाही, जेथे आहे तेथेहि अनेक अडचणी येत आहेत. अर्थात फाईव्ह जी नेटवर्क च्या चाचण्या अनेक ठिकाणी घेतल्या जाऊ लागल्या आहेत. चीन मात्र या पुढचे पाउल टाकत सिक्सजी नेटवर्क वर संशोधन करत असल्याचे चीनचे माहिती तंत्रज्ञान मंत्री मिआओ वो यांनी जाहीर केले आहे. एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले,नेक्स्ट जनरेशन मोबाईल कम्युनिकेशन नेटवर सिक्सजी विकसित करण्यास चीनने सुरवात केली आहे.

ते म्हणाले भविष्यात इंटरनेट ऑफ थिंग्स साठी चांगले, वेगवान व सुरक्षित मोबाईल नेटवर्क ची गरज आहे. भविष्यात माणसाचे आयुष्य पूर्णपणे डिजिटल बनणार आहे ज्यामुळे मानव जमातीचा मोठा फायदा होणार आहे. त्यासाठी अतिवेगवान नेटवर्क आवश्यक आहे. चालकरहित कार सह सर्व मोठ्या टेक्नोलॉजी साठी वेगवान व डेटा ट्रान्स्फर करू शकणारे नेट हवे. आमच्या हुवावे व झेडटीई कंपन्या फाईव्हजी च्याचाचण्या घेत आहेत.

इंटरनेट ऑफ थिंग्स म्हणजे सर्व गॅजेट्स इलेक्ट्रिक डिव्हाईसेस एकमेकांशी कनेक्ट असणे. म्हणजे घरात एकाच डिव्हाईस वरून अन्य सर्व गॅजेट्सना कमांड देण्यासारखी कामे कमी वेळात, अत्यंत सुरक्षितपणे करता येतील. ही एकप्रकारची स्मार्ट टेक्नोलॉजी आहे.

Leave a Comment