ओप्पोचा नवा एफ ७ स्मार्टफोन भारतात याच महिन्यात


चीनी स्मार्टफोन कंपनी ओप्पो त्याचा नवा स्मार्टफोन एफ सेव्हन मार्चच्या २८ ते ३० तारखेदरम्यान भारतीय बाजारात लाँच करणार असल्याचे समजते. कंपनीने त्याच्या ट्विटर अकौंटवरून तसे संकेत दिले आहेत. या फोनचे टीझर येथे दिले गेले आहे.

हा फोन सेल्फी सेंट्रीक असून त्याला २५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला आहे असे समजते. ६.२ इंची फुल एचडी डिस्प्ले अल्ट्राथिन बेजलसह असून त्याला वरच्या बाजूला नॉच दिला गेला आहे. फोटोग्राफी साठी एआय फिचर, रियल तैम एचडीअर, ब्युटी मोड आर स्टीकरसह आहे. अँड्राईड ओरिओ ओएस, ४ व ६ जीबी रॅम, ६४ जीबी इंटरनल मेमरी, मायक्रोकार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा दिली गेली आहे. यंदा ओप्पोने बार्सिलोना मोबाईल कॉंग्रेस मध्ये भाग घेतला नव्हता. त्यामुळे या फोन साठी वेगळा इव्हेंट केला जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment