राणी रुपमतीच्या मांडू गडावर घसरला हिलरी मॅडमचा पाय


राणी रूपमती आणि बाज बहादर याच्या प्रेमाने अमर झालेल्या मांडू गडावर अमेरिकेच्या माजी परराष्ट्रमंत्री हिलरी क्लिंटन याचा पाय घसरल्याने मोठी आफत आली मात्र त्यांच्या सोबत असलेल्या सुरक्षा रक्षक आणि गाईड विश्वनाथ तिवारी यांच्या दक्षतेमुळे मोठा अपघात टळला आणि हिलरी सुखरूपपणे मार्गस्त झाल्या. हिलरीबाईंची ही घसरण एका फोटोग्राफरने अचूक टिपली.

मिळालेल्या माहितीनुसार हिलरी क्लिंटन खासगी भेटीसाठी भारतात आल्या आहेत. त्यांनी मांडू गडावर फिरून तेथील सर्व प्रेक्षणीय स्थळे पहिली. तेथील भूमिगत पाणी व्यवस्था आणि टेरेस स्विमिंग पूल पाहून त्या थक्क झाल्या. जामा मशीद पाहून त्या होशंगाबाद मकबरयाकडे जात असताना अचानक त्याचा पाय घसरला. मात्र वेळीच त्यांना सावरले गेल्याने कोणतीही दुखापत झाली नाही.

हिलरी याच्या भेटीपूर्वी अमेरिकन सुरक्षा रक्षकांनी गडाचे पूर्ण चेकिंग केले होते. हिलरींना पाहताच गर्दी जमली मात्र बाकी पर्यटकांना थांबवून ठेवले गेले आणि हिलरीसोबत काही मोजक्या लोकांना गडावर सोडले गेले असेही समजते.

Leave a Comment