मुंबई गोवा मार्गावरील निसर्ग न्याहाळा काचेच्या रेल्वे डब्यातून


कोणत्याही पर्यटनात होणारा प्रवास हा शांती, आनंद आणि निसर्ग सौदर्याचा पुरेपूर उपभोग घेऊ देणारा असावा अशी अपेक्षा गैर म्हणता येणार नाही. गेल्या दशकभरात या दृष्टीने रेल्वेने अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यात आता काचेचे छत असलेले विशेष डब्यांची भर पडली आहे. प्रवाशांना प्रवासात संपूर्ण मार्गावरील निसर्ग डोळेभरून पाहता यावा यासाठी हे डबे फार उपयुक्त असून असा पहिला डबा मुंबई गोवा मार्गावरील दादर मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस मध्ये लावलं जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हे ग्लास टॉप असलेले कोच – विस्टाडोम चेन्नईतील इंटिग्रल कोच कारखान्यात तयार केले गेले आहेत. ४० सीटची सोय असलेल्या या डब्यात ३६० अंशात फिरणाऱ्या खुर्च्या, हँगिंग एलसीडी टीव्ही, असून बाहेरचे दृश्य सर्व कोनातून प्रवासी न्याहाळू शकतील. मुंबई गोवा हा निसर्गरम्य प्रवास या डब्यांमुळे अधिक सुंदर होणार आहे. या साठी प्रवाशांना एक्झिक्युटिव्ह क्लास एवढे भाडे भरावे लागणार आहे. रिझर्वेशन, जीएसटी व अन्य चार्ज वेगळे द्यावे लागतील. या तिकिटात कोणतीही सवलत दिली जाणार नाही. देशात प्रथमच पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी असे कोच वापरत आणले जात आहेत.

Leave a Comment