वरुणच्या ‘ऑक्टोबर’चा ट्रेलर रिलीज


नुकताच अभिनेता वरुण धवनच्या आगामी ‘ऑक्टोबर’चा ट्रेलर रिलीज करण्यात आला असून हा ट्रेलर पाहून चित्रपट त्याच्या मागील चित्रपटांपेक्षा फारच वेगळा असल्याचे स्पष्ट होत आहे . वरुणचा यामध्ये निराळा अंदाज आहे. कुठेतरी तो हरवल्यासारखा या ट्रेलरमध्ये दिसत आहे.

१३ एप्रिल रोजी शूजित सरकार दिग्दर्शित हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. वरुण चित्रपटातील व्यक्तिरेखा खरीखुरी वाटण्यासाठी एक आठवडा झोपला नाही. व्यक्तिरेखा पूर्णत: जिवंत वाटण्यासाठीच शूजित सरकारने त्याला असे करण्यास सांगितले होते. आयुष्याच्या अनेक छटा या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. हा रोमँटिक चित्रपट नाही तर प्रेमासाठी घेतलेल्या ठोस पावलावर आधारित असल्याचे शूजित सरकारने आधीच सांगितले आहे. चित्रपटात वरुणसोबत बनिता संधू दिसणार आहे.