ही फुले आहेत खाता येण्याजोगी


जगातील नामांकित शेफ्स ते बनवीत असलेल्या पदार्थांमध्ये अनेकविध दुर्मिळ वस्तूंचा उपयोग करीत असतात. अस्सल सोन्याच्या वर्खापासून ते दुर्मिळ वनस्पती इथपर्यंत सर्व वस्तूंचा उपयोग केला जातो. तर काही ठिकाणी फुलांचा उपयोग जेवणामध्ये केला जातो. भारतातील आणि इतर देशांमधील शेफ्स देखील आता पाककलेमध्ये फुलांचा सढळ हस्ते वापर करू लागले आहेत. भारतामध्ये केळफुला सारख्या फुलांची भाजी करण्याची पद्धत फार जुन्या काळापासून चालत आली आहे. पण त्याशिवाय झेंडूची फुले, शेवग्याची फुले, कॅमोमाईल, लॅव्हेंडर या फुलांचाही वापर आता पाकशास्त्रामध्ये होऊ लागला आहे.

झेंडूच्या फुलांची चव काहीशी कडसर असून अनेक पदार्थ बनविताना त्यांचा वापर केला जातो. तसेच झेंडूच्या फुलांपासून तयार केल्या जाणाऱ्या व्हीनेगरचा वापर अनेक सॅलड्समध्ये केला जातो. अनेक ठिकाणी चहामध्ये झेंडूच्या पाकळ्या घालण्याची पद्धत आहे. केरळ आणि महाराष्ट्रामध्ये केळफुलाची भाजी करण्याची पद्धत फार पूर्वीपासून चालत आली आहे. केळफुलामध्ये लोह आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणामध्ये असून, ह्याच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते.

शेवग्याच्या फुलांचा वापर चहामध्ये घालण्यासाठी केला जातो. ओल्या चटण्या बनविताना ही फुले त्यामध्ये घातली जातात. तेलामध्ये ही फुले टाळून त्यांचे कुरकुरीत स्नॅक्स तयार करता येऊ शकतात. ह्या फुलांमध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम मोठ्या प्रमाणावर असते. पुदिन्याची पाने देखील स्वयंपाकामध्ये वापरता येतात. अनेक तऱ्हेच्या मिठायांमध्ये, किंवा शीतपेयांमध्ये यांचा वापर केला जातो. या फुलांच्या सेवनाने पचनतंत्र सुरळीत राहते.

गुलाबाच्या फुलांचा वापर गुलकंद करण्याकरिता केला जातो हे आपल्याला माहीतच आहे. तसेच यांचा वापर अनेक तऱ्हेचे जॅम किंवा जेली बनविण्याकरिता केला जातो. पपईच्या फुलांमध्ये जीवनसत्वे आहेत. तसेच कोलेस्टेरोल कमी करून भूक वाढविणारी आणि मधुमेहासाठी गुणकारी अशी ही फुले आहेत. अनेक भाज्यांमध्ये ही फुले घातली जातात.

Leave a Comment