श्रीदेवी मृत्यू बोनी कपूरमुळेच; नातेवाईकांचा आरोप


अचानक बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे निधन झाल्याने सर्वांनाच झटका बसला आहे. अद्यापही चाहते आणि बॉलिवूडकर या धक्क्यातून सावरलेले नाही. श्रीदेवींचे २४ फेब्रुवारीला दुबईत निधन झाल्यानंतर पोस्टमार्टम रिपोर्टनुसार बाथटबमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. श्रीदेवी यांचे काका वेणुगोपाल रेड्डी यांनी याच दरम्यान एक धक्कादायक आरोप केला आहे.

एका तेलुगू वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत वेणुगोपाल रेड्डी यांनी आरोप केला, की श्रीदेवींच्या मृत्यूचे कारण त्यांचे पती बोनी कपूर आहेत. श्रीदेवींच्या आयुष्यात प्रचंड दुःख होते, असे ते म्हणाले. सर्वांसमोर हसत राहणारा चेहरा आतून प्रचंड दुःखात होता. बोनी कपूर हे बरेच चित्रपट फ्लॉप गेल्यामुळे तोट्यात होते. बोनी कपूर यांनी यामुळे श्रीदेवींच्या नावावर असलेली अनेक संपत्ती विकून टाकली. श्रीदेवी संपत्ती विकली गेल्याने आणि आर्थिक स्थिती ठीक नसल्याने कायम चिंतीत असायच्या. याचे कारणही बोनी कपूर हेच होते. श्रीदेवींनी कुटुंबाला सांभाळण्यासाठीच पुन्हा कामास सुरुवात केली. या चिंतेमुळे मृत्यूनंतरही तिच्या जीवाला शांती मिळू शकणार नाही, असे वेणुगोपाल यांनी म्हटले.