Skip links

राहुल द्रविडसह ८०० जणांना ‘या’ कंपनीने लावला कोट्यवधींचा चुना


बंगळुरू : विक्रम इनव्हेस्टमेंट या कंपनीने भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड, बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि प्रकाश पादुकोण यासारखे खेळाडू आणि जवळपास ८०० जणांना कोट्यवधींचा चुना लावला आहे. या ८०० जणांपैकी अनेकजण चित्रपट, खेळ आणि राजकारणाशी जोडले गेले आहेत.

राहुल द्रविड, सायना नेहवाल आणि प्रकाश पादुकोण यांच्यासारख्या सेलिब्रिटींची कर्नाटकच्या बंगळुरूची असलेली विक्रम इनव्हेस्टमेंट नावाच्या कंपनीने फसवणूक केली. कंपनीचा मालक राघवेंद्र श्रीनाथ आणि एजंट म्हणून काम करणारा सुतराम सुरेश, नरसिम्हामूर्ती, केसी. नागराज आणि प्रल्हाद यांना पोलिसांनी अटक केली आहे.

सुतराम सुरेश बंगळुरूमधील क्रीडा पत्रकार असून सुरेश खेळाडूंना या स्कीममध्ये पैसे गुंतवण्यासाठी तयार करायचा. १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत या आरोपींना पाठवण्यात आले आहे. या सगळ्यांनी ३०० कोटींची फसवणूक केल्याचा अंदाज आहे. आरोपींच्या बँक खात्यांची चौकशी सध्या सुरु आहे. फसवणूक करणारी ही कंपनी गुंतवणूकदारांना ४० टक्के परतावा देण्याचे आश्वासन देत होती. आपली फसवणूक झाली असली तरी या खेळाडूंनी मात्र अजूनही याबाबत अधिकृत वक्तव्य केलेले नाही.

Web Title: Rahul Dravid, Saina Nehwal, Prakash Padukone Among 800 'Duped' by Bengaluru Ponzi Firm