शमीच्या समर्थनार्थ पुढे आला धोनी


कोलकाता : आता माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला पाठिंबा द्यायला पुढे आला आला. त्याचबरोबर शमीचे सासरे मोहम्मद हसन यांनीही त्याची बाजू घेतली आहे. पैशांसाठी पत्नी आणि देशाला शमी धोका देऊ शकत नाही, असे वक्तव्य धोनीने केले आहे.

पत्नी हसीन जहाँने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. पण तिच्या आरोपांच्या फैरी संपल्यावर तिच्या चरित्राबद्दल बऱ्याच गोष्टी प्रकाशझोतात आल्या आहेत. हसीनच्या वडिलांनीच शमीची बाजू घेतल्यामुळे तिची बाजू कमकुवत झाल्याचे म्हटले जात आहे.

यावेळी शमीला भारताचा माजी कर्णधार धोनीने पाठिंबा दशर्वला आहे. धोनी शमीबाबत म्हणाला की, शमी हा एक चांगला व्यक्ती असून पैशांसाठी तो पत्नी आणि देशाला धोकाच देऊ शकत नाही. कारण तो एक व्यक्ती आणि खेळाडू म्हणून कसा आहे, हे मी चांगलेच जाणतो. बाकी शमीच्या पत्नीने त्याच्यावर जे काही आरोप केले आहेत त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही, कारण ती त्यांची वैयक्तिक बाब आहे. त्याविषयी बोलणे उचित ठरणार नाही.

हसीनने शमीवर केलेले आरोप हे त्याच्या सासऱ्यांना प्रसारमाध्यमांमुळे माहिती झाले. याबबात ते म्हणाले की, या गंभीर बाबींबाबत हसीनने मला कधीही काहीच सांगितले नसल्यामुळे मला या भांडणाबाबत जास्त काहीच माहिती नाही. पण शमी हा एक शांत स्वभावाचा माणूस आहे. तो मितभाषीही आहे. शाळेपासूनच आपल्याला काय व्हायचे आहे, हे ध्येय हसीनने डोळ्यापुढे ठेवले होते. या ध्येयापासून ती कधीही मागे हटणारी नाही.