अन् तो क्षण विराटने केला कॅमेऱ्यात कैद


विराट कोहलीसोबतचा एक फोटो बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा फोटो सोशल मीडियावर शेअर होताच तो काही मिनिटांमध्ये व्हायरलही झाला. विराटला अनुष्का किस करत करत असतानाचा तो क्षण विराटने कॅमेऱ्यात कैद केला. जेव्हा हा फोटो अनुष्काने इन्स्टाग्रामवर शेअर केला तेव्हा अवघ्या काही मिनिटांच्या आत या फोटोला ६ लाखांहून अधिक लाइक्स मिळाले.

💑

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on


विराट दक्षिण आफ्रिकेची मालिका संपवून नुकताच मुंबईला त्याच्या नवीन घरी परतला. अनुष्काही तिचे ‘सुई- धागा’ या चित्रपटाचे चित्रीकरण संपवून मुंबईला परतली. अनुष्काला घ्यायला विराट मुंबई विमानतळावरही गेला होता. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत सध्या हे दोघे एकमेकांसोबत ‘क्वॉलिटी टाइम’ घालवत आहेत असेच म्हणावे लागेल. एकमेकांवरचे प्रेम सोशल मीडियावरही दाखवण्याची एकही संधी सोडत नाहीत. विराटने आधी अनुष्कासोबतचा दक्षिण आफ्रिकेमधील एक फोटो शेअर केला होता. तर आता अनुष्काने विराटला किस करतानाचा फोटो शेअर केला आहे.