अजय देवगणचा कपिल शर्माला ‘बाबाजी का टूल्लू’


कॉमेडीचा बादशाह कपिल शर्मा प्रेक्षकांच्या पुन्हा भेटीस येत असून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या कॉमेडी विनोदाने अधिराज्य गाजवण्यास तो सज्ज झाला आहे. लवकरच कपिल शर्माचा ‘फॅमिली टाईम विथ कपिल’ हा नवा शो येत आहे. नुकताच याचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे.

शोच्या एपिसोडमध्ये पहिला पाहुणा म्हणून अभिनेता अजय देवगण ‘रेड’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावणार आहे. या चित्रपटात अजय सोबतच इलियाना डिक्रुज देखील काम करत असल्यामुळे या ती देखील शोमध्ये येणार आहे.

कपिल शर्मा नवीन प्रोमोमध्ये अजय देवगणला आपल्या शोमध्ये येण्यास विनंती करतो. पण अजय कपिलसोबत मजाक करतो, जेव्हा कपिल अजयला फोन लावतो तेव्हा अजय आपला फोन व्यस्त असल्याचे सांगतो, असा हा मजेशीर प्रोमो आहे.