हनिमून अर्धवट सोडून पळाला होता अजय देवगन


येत्या १६ मार्चला बॉलिवूडचा सिंघम अजय देवगनचा बहुप्रतिक्षित ‘रेड’ हा चित्रपट प्रदर्शित होत असून अजय देवगन या चित्रपटात लखनऊचे इनकम टॅक्स ऑफिसर अमेय पटनायक ही व्यक्तिरेखा साकारत आहे. जो काळा पैसा लपवणाऱ्या देशातील गद्दारांच्या घरी धाड टाकत असतो. या चित्रपटाचे पोस्टर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आले होते. आता त्याने या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील गोष्टी शेअर केल्या. त्याने काजोल सोबत लग्नानंतरच्या हनिमूनची एक आठवण सांगितली.

त्याने आपण हनीमून अर्धवट सोडून पळून आल्याचे सांगितले. त्याने हनिमूनबद्दलचा हा किस्सा पहिल्यांदाच शेअर केला. मी आणि काजोलने हनिमूनसाठी २ महिने सुट्टी घेतली होती. हा वेळ मला खूपच मोठा वाटत होता. म्हणून मी हनीमून अर्धवट सोडल्याचे अजयने सांगितले. केवळ अर्ध्या तासात आमचे लग्न झाल्याचे त्याने सांगितले. लग्न उरकून मी लगेच घरात परतल्याचेही त्याने सांगितले.

‘रेड’चे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता करत आहेत. अजयसोबत या चित्रपटात इलियाना डिक्रूज देखील आहे. याआधी अजय-इलियानाची जोडी ‘बादशाहो’मध्ये पाहायला मिळाली होती. या दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. मात्र ‘बादशाहो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चांगले प्रदर्शन करु शकला नाही.