मॅक्लरेनची सर्वात वेगवान कार, स्पीड ताशी ३९१ किमी


मॅक्लरेन या रेसिंग कार उत्पादक कंपनीने त्यांची एकदम न्यू ब्रांड हायपर जीटी कार बिपी २३ या कोडनेमने बाजारात आणली जात असल्याची घोषणा केली आहे. जिनेव्हा येथे सुरु असलेल्या मोटर शो मध्ये कंपनीचे सीईओ माईक फ्लाविट यांनी ही घोषणा केली आहे. त्यानुसार कंपनीची ही आत्तापर्यंतची सर्वात वेगवान कार असून तिचा वेग ताशी ३९१ किमी आहे.

ही फॉर्म्यूला वन रोडकार दमदार इंजिनासह आहे. अल्टीमेट सिरीज मधले हे पुढचे मॉडेल असून यात ड्रायविंग सीत मधोमध आहे. याच वर्षात या कारचा पब्लिक डेब्यू केला जाणार असून तिची फक्त १०६ युनिट बनविली गेली आहेत. नोव्हेंबर २०१६ मध्ये या कारची घोषणा केली गेली होती य तेव्हाच सर्व १०६ युनिट साठी नोंदणी पूर्ण झाली होती असे समजते. या कारची किंमत १०.६ दशलक्ष पौंड म्हणजे १४.४१ कोटी रुपये असून त्यावर वेगळे कर भरावे लागणार आहेत. ग्राहकाच्या आवडीनुसार ती पर्सनलाईज्ड करता येणार आहे. फॉर्म्युला वन प्रमाणे तिचा लेआउट आहे. या कारला पेट्रोल इलेक्ट्रिक हायब्रीड व्हर्जन इंजिन दिले गेले आहे.

Leave a Comment