जगातल्या टॉप ९ कंपन्यांची सूत्रे भारतीयांच्या हाती


मायक्रोब्लॉगिंग साईट ट्विटर इंक ने भारतीय पराग अग्रवाल याची सिटीओ म्हणून नुकतीच नेमणूक केली असून ते २०११ पासून या कंपनीत विविध जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. जगात आज ९ टॉप आयटी आणि टेक कंपन्याचा कारभार भारतीयांच्या हातात असून भारतीयांच्या अक्कलहुशारीवर या कंपन्या व्यवसायाची नवी क्षितिजे गाठताना दिसत आहेत. त्यात गुगल पासून ते नोकिया पर्यंत अनेक नामवंत कंपन्या आहेत.

गुगलचे सीईओ सुंदर पिअचाई तामिळनाडूचे रहिवासी आणि खरगपूर आयआयटीचे पदवीधर. त्यानंतर त्यांनी स्टॅनफोर्डमधून पुढील शिक्षण घेतले आहे. ऑगस्ट २०१५ मध्ये ते गुगलचे सीईओ बनले असून त्यांचा वार्षिक पगार आहे १२९८ कोटी रुपये. मायक्रोसॉफ्टचे सत्य नादेला फेब्रुवारी २०१४ मध्ये कंपनीचे प्रमुख बनले आहेत व त्यांना या जबाबदारी साठी वर्षाला १३० कोटी रुपये पगार मिळतो.


नोकियाचे सीईओ आणि प्रेसिडेंट राजीव सुरी यांनी पदभार एप्रिल २०१४ मध्ये स्वीकारला असून त्यांना वर्षाला ६० कोटी रुपये मिळतात तर अडोब चे सीईओ शंतनू नारायण यांना वर्षाला १३० कोटी रुपये मिळतात. त्यांनी पदाची सूत्रे नोव्हेंबर २००७ मध्ये घेतली आहेत. नेटअॅपचे सीईओ, प्रेसिडेंट जॉन कुरियन यांना ५८ कोटी पगार मिळतो तर कोग्निझंटचे सीईओ फ्रान्सिस्को डिसुझा यांना ५३ कोटी रु.पगार मिळतो.

हरमन इंटरनॅशनलचे दिनेश पालीवाल जुलै २००७ पासून या पदावर असून त्यांना वर्षाला ८५ कोटी रुपये पगार आहे तर कान्ड्यूएंट इंकचे अशोक वेमुरी ३५ कोटी रु. पगार घेतात. मायक्रोन टेक्नो इंकचे सीईओ संजय मेहरोत्रा मी २०१७ पासून या पदावर असून त्यांना ६९ कोटी रुपये वार्षिक पगार आहे.

Leave a Comment