स्वस्तात मस्त बाईक देणारा बाजार


सर्व बाईक कंपन्याच्या शोरूम्स मधून आता सेकण्ड हँड बाईक विक्रीचा ट्रेंड रुळू पाहतो आहे. मात्र येथे एक तोटा असा कि संबंधित कंपनीची बाईक तेथे मिळू शकते. दिल्लीच्या करोल बाग भागात सेकण्डहँड बाईक विक्रीचा प्रचंड मोठा बाजार असून येथे कोणत्याची कंपनीची बाईक स्वस्तात मिळू शकते. आकाराने प्रचंड अश्या या बाजारात घासाघीस करायची तयारी असले तर ७० हजाराची बाईक १५ हजारात आणि महागड्या लक्झरी बाईक निम्म्यापेक्ष्या कमी किमतीत मिळू शकतात.


येथे बाईक खरेदी साठी जाताना तुम्हाला बाईकच्या सुट्या भागांचे ज्ञान असेल तर उत्तम. पण नसेल तर एखादा खात्रीचा मेकॅनिक अथवा एक्स्पर्ट सोबत असलेला बरा. येथे बजाज पासून रॉयल एन्फिल्ड, दुकाती पर्यंत सर्व सेकण्डहँड बाईक नोंदणी सर्टीफिकेट सह मिळतील. अनेक बाईक फक्त १०० किंवा ५०० किमी रनिंग झालेल्याही असतात. काही कारणाने मालक त्या विकतात आणि ग्राहकाला चांगली बाईक स्वस्तात खरेदी करता येते. लाखो रुपये किमतीच्या बाईक येथे निम्म्या किमतीत खरेदी करता येतात त्यासाठी थोडी बार्गेनिंग कला अवगत हवी.