रेल्वेची सलून कार सर्वांसाठी उपलब्ध होणार


रेल्वे ची विशेष सुविधा असलेली सलून कार आता रेल्वे अधिकाऱ्यांप्रमाणे सर्वसामान्य लोकांनाही उपलब्ध होणार आहे. कुणीही प्रवासी सलून कार साठी बुकिंग करू शकणार असून हे बुकिंग रेल्वेच्या आयअरसीटीसी कार्यालयाकडे करता येणार आहे. ऑनलाईन बुकिंग सुविधाही दिली गेली आहे.


आयआरसीटीसी मधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार सध्या सलून कारचे दहा कोच उपलब्ध केले गेले आहेत व लवकरच ही संख्या वाढविली जात आहे.बुकिंग केलेल्या पार्टीला जेथे जावयाचे असेल त्यानुसार ही कार मेल किंवा एक्स्प्रेस ट्रेनला जोडले जाणार आहेत. अगदी लग्नाची वरात नेण्यासाठी ही अतिशय उत्तम सोय असेल. त्याचबरोबर कंपन्याच्या बैठका वा अन्य कारणासाठी या सलून कार आदर्श ठरणार आहेत.

या डब्यात दोन बेडरूम्स असतील. एका बेडरूममध्ये मास्टर बेड दुसऱ्यात दोन बंकर बेड स्वच्छतागृहासह असतील. टीव्ही, खाण्यापिण्यासाठी लिविंग कम डायनिंग रूम, टेबल, खुर्च्या अशी सर्व उत्तम सोय यात मिळणार आहे. प्रवासाच्या अंतरानुसार भाडे द्यावे लागेल असे स्पष्ट केले गेले आहे.

Leave a Comment