अत्याधुनिक सेन्सर तंत्रज्ञानाने देशाच्या सीमा बनणार अभेद्य


इस्त्रायलप्रमाणे अत्याधुनिक सेन्सर तंत्रज्ञान वापरून भारत आपल्या सीमा सुरक्षित करत असल्याचे समजेत. हे तंत्रज्ञान वापरणारा भारत इस्त्रायल नंतर जगातला दुसरा देश ठरणार आहे. यामुळे घुसखोरी सारख्या घटना त्वरित लक्षात येतीलच पण सीमेला लागून शेजारी देश काय हालचाली करत आहेत याची इत्यंभूत हकीकत लष्करला समजू शकणार आहे. गेले काही दिवस हे तंत्रज्ञान भारताला देण्याबाबत इस्त्रायलशी बोलणी सुरु होती आणि इस्त्रायलने हे तंत्रज्ञान देण्याची तयारी दर्शविली आहे. यामुळे भारताच्या सीमा आता अभेद्य बनतील असा विश्वास व्यक्त होत आहे.

डीआरडीओ च्या सूचनेनुसार आयआयटी, आयएसएम धनबाद येह्तील संशोधकांनी हे तंत्र विकसित करण्यात यश मिळविले आहे. जगात वायरलेस सेन्सर नेटवर्क देशाच्या सीमेवर अद्यापि मोठ्या प्रमाणात वापरले गेलेले नाही. इस्त्रायल ने हे तंत्रज्ञान उपयोगात आणले आहे आणि जुलै पासून भारत त्याचा उपयोग करणार आहे.यामुळे शेजारी देशांचा सीमा भागात लक्ष ठेवणे सुकर होणार आहे.

या तंत्रज्ञानात सीमेवर बसविलेले सेन्सर प्रत्येक हालचाल टिपून ती बेस स्टेशनवर पोहोचवितात. ही माहिती त्वरीत सीमेवर तैनात असलेल्या जवान, अधिकाऱ्यांना दिली जाते. ज्या ठिकाणी कुंपण घालणे शक्य नाही अश्या दुर्गम सीमा भागात हे तंत्रज्ञान फारच उपयुक्त ठरते असा अनुभव आहे.

Leave a Comment