मधुमेह दोन नव्हे, तर पाच प्रकारांचा – पाहणीचा निष्कर्ष


मधुमेहाने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींना आतापर्यंत दोन गटांना विभागण्यात येत असे. मात्र मधुमेहींचे केवळ दोनच नाही, तर पाच प्रकार असतात असे एका नवीन संशोधनातून पुढे आले आहे.

मधुमेहाचे सध्या दोन प्रमुख गटांमध्ये विभाजन करण्यात येते – टाइप 1 डायबिटीस जो सुमारे 10 टक्के व्यक्तींमध्ये आढळतो आणि टाइप -2 डायबिटीस जो 85-90 टक्के व्यक्तींमध्ये आढळतो.

टाइप -1 मधुमेह सामान्यतः बालपणात होतो. यात स्वादुपिंडात इन्सुलिन कमी उत्पन्न होते किंवा होतच नाही. टाइप टू 2 मधुमेहात शरीर संप्रेरक इन्शुलीनचा योग्य वापर करीत नाहीत आणि रक्तातील शर्करेचे प्रमाण सामान्य पातळीवर ठेवणे त्यास असमर्थ होते. आता नव्या संशोधनानुसार, टाईप २ मधुमेहामध्येही अनेक उपप्रकार असतात.

लान्सेट या प्रसिद्ध नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे. लुंड विद्यापीठातील प्राध्यापक लीफ गृप यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन करण्यात आले आहे. “मधुमेहावर वैयक्तिक उपचार करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल आहे,” असे त्यांनी सांगितले.

आज जगभरात सुमारे 42 कोटी 5० दशलक्ष लोक मधुमेहग्रस्त आहेत आणि 2045 पर्यंत ही संख्या वाढून 6 कोटी 9० लाख होण्याची शक्यता आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment