विराट कोहली उबरचा ब्रँड अॅम्बेसेडर


मुंबई : शहरी गतीशीलतेची जगाला नव्याने ओळख करून देणाऱ्या उबर रायडिंग अॅपने भारतातील पहिले ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीच्या नियुक्तीची घोषणा केली आहे. उबर व विराट कोहली हे या भागीदारीतून येत्या काही वर्षांमध्ये नागरिक व समुदायांचे सशक्तीकरण करण्याच्या सामायिक दृष्टिकोनातून देशात अब्जावधी डॉलर्सची सेवा पुरवण्याचे उबरचे वचन अधोरेखित करताना दिसतील.

उबर इंडिया आणि एसए अध्यक्ष अमित जैन या प्रसंगी बोलताना म्हणाले, विराट कोहली यांची उबर इंडियाचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड व्हावी याचा आम्हांला अतिशय आनंद आहे. त्याची भारताबद्दल ऑन अँड ऑफ फिल्ड बांधिलकी प्रशंसनीय असून सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या दृष्टीने देशाला जागतिक नावलौकिक प्राप्त करून देण्यापासून ते समाजात वेगळे स्थान मिळवून देण्याच्या दृष्टीने त्याने गुंतवणूक केलेली आहे. देशाला सेवा पुरवण्याची बांधिलकी जपत असताना, दरदिवशी देशभरात आम्ही जी ऊर्जा निर्माण करतो विराट कोहली यांच्या रुपाने त्याचप्रकारची ऊर्जा असलेले व्यक्तिमत्त्व आम्हला गवसले आहे. आपल्या हेतू व सार्वत्रिकतेचे जे प्रतिनिधित्व युथ आयकॉन म्हणून विराट कोहली करतो ते देशाला पुढे नेणाऱ्या आमच्या प्रवासाचा मार्ग आखण्यास मदत करेल.

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली उबरशी जोडले जाण्याविषयी बोलताना म्हणाला, क्रिकेटपटू म्हणून मी बरेच प्रवास करतो आणि उबर बुक करण्याचा अनुभव मी स्वतः अनुभवतो आहे. ही कंपनी लोकांना शहराकडे वळवण्याच्या मार्गात क्रांती घडवून आणण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करत आहे आणि आर्थिक संधी निर्माण करून लाखो लोकांना सक्षम बनवते हे पाहणे आनंददायी आहे. जिथे काम करतात त्या शहराशी व लोकांशी बांधिलकी जपणाऱ्या अशा कंपनीशी हात मिळवण्यास मी उत्सुक आहे.

Leave a Comment