६० वर्ष जुन्या झाडाचे खोड कापल्यावर चकित झाले लोक


जंगलांमध्ये लाकूड तोडल्यानंतर लोकांना असे काही मिळाले की, ते दृष्य पाहून लोक चकित झाले. जॉर्जियामधील या जंगलामध्ये अनेक वर्षांपुर्वी जुने झाड कापण्यात आली होती. तेव्हा कुत्र्याचे चकीत करणारे प्रेत एका झाडाच्या खोडात दिसले. झाडाप्रमाणेच हा सापळा भयानक दिसत होता. संशोधकांचा दावा आहे की, जवळपास २० वर्षांपासून हा कुत्रा हे झाडाच्या खोडात आहे.

संशोधकही कुत्र्याचे झाडामधील अवशेष पाहून चकित झाले. हे पाहून सोशल मीडियावर जादू टोना असल्याचे म्हटले गेले. दरम्यान एका तज्ञाने यामागील रहस्य सांगितले.

तज्ञाने सांगितले की, एखाद्या लहान प्राण्याची शिकार करण्यासाठी कुत्रे जमीन खोदून झाडाच्या खोडापर्यंत पोहोचले असेल. परंतू नंतर त्याला परतता आले नसावे आणि तहान-भूकेमुळे त्याला मृत्यू झाला असेल. सर्वात जास्त चकित करणारी गोष्ट म्हणजे कुत्रे हे जसेच्या तसे राहिले. ते खराब झाले नाही. यावर तज्ञ म्हणाले की, झाडाच्यामध्ये हवा पोहोचली नाही. यामुळे बॅक्टेरिया कुत्र्यापर्यंत पोहोचू शकले नाही. यासोबतच झाडामधील काही रसायनांमुळे कुत्रे खराब झाले नाही. कुत्र्याची बॉडी सडण्याऐवजी कडक सापळ्यामध्ये रुपांतरीत झाली. जॉर्जियामध्ये हे झाड आणि सापळा म्युझियममध्ये प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

Leave a Comment