रिझर्व्ह बँकेने एअरटेल बँकेला ठोठावला पाच कोटीचा दंड


नवी दिल्ली – मार्गदर्शक तत्त्वे आणि केवायसी नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एअरटेल पेमेन्ट्स बँकेला भारतीय रिझर्व्ह बँकेने दणका दिला. एअरटेल बँकेला मध्यवर्ती बँकेकडून ५ कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. ग्राहकांच्या परवानगीशिवाय भारती एअरटेलने पेमेन्ट्स बँकेमध्ये खाते सुरू केल्याचा आरोप आहे. ही कारवाई पेमेन्ट्स बँकेसाठी वेळोवेळी जारी करण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने करण्यात आली. एअरटेल पेमेन्ट्स बँकेच्या नियमावलीमध्ये अनेक उणीवा आहेत आणि ग्राहकांची परवानगी घेण्यात आलेली नव्हती.

Leave a Comment