आयवुमीचा आय वन एस स्मार्टफोन सादर


चीनी स्मार्टफोन कंपनी आयवूमीने त्यांचा अॅनिव्हर्सरी एडिशन आय वन एस स्मार्टफोन भारतात सादर केला असून ७४९९ रुपयात तो फ्लिपकार्ट वर उपलब्ध आहे. विशेष म्हणजे या फोनवर रिलायंस जिओ फुटबॉल ऑफर अंतर्गत २२०० रु. कॅशबॅक सुविधा असल्याने हा फोन ५२९९ रु. मिळू शकणार आहे.

या फोन मध्ये फिंगरप्रिंट सेन्सरसह फेस अनलॉक फिचर दिले गेले आहे. यामुळे या फिचरच्या सहाय्याने फोन अनलॉक करता येईल. ८ हजार रुपयांपेक्षा कमी किमतीच्या फोनमध्ये हे फिचर देणारी ही पहिलीच कंपनी असल्याचा दावा केला जात आहे. या फोनला ५.४५ इंची डिस्प्ले, ३ जीबी रॅम, ३२ जीबी मेमरी ती कार्डच्या सहाय्याने १२८ जीबी पर्यंत वाढविण्याची सुविधा आहे. रिअरला १३ व २ एमपीचे दोन कॅमेरे, सेल्फी साठी ८ एमपीचा फ्रंट कॅमेरा आहे. हा फोन अँड्राईड ७.० नगेट ओएस ला सपोर्ट करतो.

Leave a Comment