रॉयल एन्फिल्डचे युज्ड बाईक विक्री क्षेत्रात पदार्पण


महागड्या बाईक बनविणारी कंपनी रॉयल एन्फिल्डने युज्ड बाईक विक्री क्षेत्रात पदार्पण केले असून पहिले विंटेज बाईक स्टोअर चेन्नई येथे सुरु केले आहे. अशी स्टोअर देशभर उधडली जाणार असल्याचे भारताची कंपनीचे व्यवसाय प्रमुख शाजी कोशी यांनी सांगितले.

कोशी म्हणाले या स्टोअर मध्ये वापरलेल्या आणि पूर्ण दुरुस्त केलेल्या सेकण्डहँड बाईक विक्रीसाठी असतील. सेकण्डहँड एन्फिल्ड खरेदी करू इच्छिणारा ग्राहक आमचे लक्ष्य आहे. या बाईकसाठी खूप मागणी आहे. त्यामुळे एन्फिल्डच्या राईड आणि रोमांच कथा पुढेही सुरु राहतील. या वर्षात देशात अशी १० विंटेज स्टोअर उघडली जाणार आहेत. चांगल्या कंडीशनमधील गाड्या येथे मिळतीलच पण त्यासोबत विमा, अर्थसहाय्य, विक्री पश्चात सेवा या सर्व सुविधा ग्राहकाला दिल्या जाणार आहेत.

Leave a Comment